गोवा बनावटीच्या ४६८ लिटर मद्यपेयासह टवेरा वाहन जप्त
बेळगाव: मान्य पोलिस आयुक्त, बेळगाव शहर, मान्य उप पोलिस आयुक्त (क्राइम अँड ट्रॅफिक) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सीसीबी इन्स्पेक्टर श्री. नंदीश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस टीमने गोव्याहून बेळगाव शहरात अवैध पद्धतीने विक्रीसाठी आणले जात असलेल्या ४६८.४८० लिटर मद्यपेयासह एक टवेरा वाहन जप्त केले आहे.https://dmedia24.com/inauguration-of-cricket-net-at-benkanhali/
या कारवाईत श्री. मंजुनाथ भजंत्री (PSI) व इतर सीसीबी स्टाफ सहभागी होते. दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी गोव्यातून बेळगावला वेगवेगळ्या कंपन्यांची दारू अवैधरीत्या विक्रीसाठी आणली जात असताना ती पोलिसांनी अडवली.ही मद्यपेये टवेरा वाहनातून वाहून नेण्यात येत होती.श्री. मंजुनाथ गिडगेरी आणि युवराज नाईक (बेळगाव) यांच्याकडून ही मद्यपेये जप्त करण्यात आली. अंदाजे ३ लाख रुपयांच्या किमतीची ही मद्यपेये आहेत.
या कारवाईमध्ये श्री. एस.सी. कोरे, श्री. आय.एस. पाटील, श्री. एस.बी. पाटील, श्री. एम.एस. पाटील आणि श्री. जगदीश हादिमणी या पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या संदर्भात काकती पोलिस ठाण्यात केस नोंदवण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली असून, अवैध मद्य विक्रीच्या जाळ्यातील इतर जबाबदार व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.