अल्पवयीन मुलीला बळजबरीने मद्य पाजवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला मद्य पाजवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव औरंगजेब (२३) असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी औरंगजेबचा शोध सुरु केला आहे. औरंगजेब याला मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून औरंगजेब याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. गेल्या काही दिवसापासून तो मुलीला माझ्याशी लग्न कर म्हणून पाठ लागला होता. तीन दिवसापूर्वी मुलीच्या घरात कोण नसलेले पाहून त्याने चाकू, तलवार दाखवून मुलीला धमकावून तिला मुलीला बळजबरीने मद्य प्यायला लावून तिच्यावर अत्याचार केला.
- ही घटना उघडकीस येताच त्या भागातील लोकांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या औरंगजेब याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.मुलीच्या पालकांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे