निपाणी हुडको कॉलनी येथे निपाणी तालुक्यातील 60हून अधिक दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांनां परीक्षा मध्ये जास्त गुण मिळवलेला असा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी प.पू.प्रभूलिंग स्वामीजी व सद्गुरु सच्चिदानंद बाबा यांच्या हास्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा अखंड भारत मातेचे स्मृतिचिन्ह,भगवद्गीता देवून आशीर्वाद रुपी सत्कार करण्यात आला.
यावेळी प.पू.प्रभूलिंग स्वामीजी यांनी अशिर्वचन देते वेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण अवस्थेत फक्त ज्ञानग्रहण करावे. यावेळी टीव्ही मोबाईल यापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा व सोशल मीडिया वर आवश्यक तेवढेच सहभागी राहवावे. या वयात आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय विचार आपल्या आचार तसेच संत महंत क्रांतिकारक यांच्या चरित्र आणून देऊन त्यांच्याकडून ते वाचून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला शिकवावे असे मार्गदर्शन करतेवेळी प.पू. प्रभूलिंग स्वामीजी यांनी मत व्यक्त केले. यावेळी प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी सद्गुरू सच्चिदानंद बाबा यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमाचे कौतुक केले असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले पाहिजे तसेच शिक्षण घेते वेळी कोणत्याही विद्यार्थ्यांना कसली ही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्व साधुसंत संत उभा राहतील असा संदेश प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी दिला.
हिंदू हेल्प लाईन चे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की निपाणीमधील साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हेल्प लाईन च्या वतीने यावर्षीपासून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन पास झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आशीर्वाद रुपी सत्कार करून गौरवण्यात आले आहे यावेळी हिंदू हेल्प लाईन च्या वतीने निपाणी आणी निपाणी परिसरात विविध उपक्रम राबवले जात असताता असे सांगितले यावेळी ओम शक्ती मठाचे प.पू.अरुणानंदतीर्थ स्वामीजी, मुरुघेन्द्र मठचे प.पू. बसवमल्लिकार्जुन स्वामीजी, आडी मठ येथील प.पू.सिद्धेश्वर स्वामी, यांनी ही गुणवंत विद्यार्थांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या. तसेच सनातन संस्थेचे सुनील वाडकर यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जनवाडे तर आभार दीपक भोपळे यांनी मानले….हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड.बेंद्रे मॅडम, नगरसेवक राजू गुंडेशा,संतोष गायकवाड,वासुदेव गुंडेशा,प्रवीण भिसे,सुहास जाधव,राजेंद्र गुरव,यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले…यावेळी मोठ्या संख्येनं भक्त मंडळी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते….