This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गोसेवा करणे म्हणजे मोठ्ये पुण्याचे काम-प. पू. प्राणलिंग स्वामीजी* समाधीमठा गोशाळाला पूजेच्या 5टन ऊस अर्पण

*गोसेवा करणे म्हणजे मोठ्ये पुण्याचे काम-प. पू. प्राणलिंग स्वामीजी* समाधीमठा गोशाळाला पूजेच्या 5टन ऊस अर्पण
D Media 24

गोसेवा करणे म्हणजे मोठ्ये पुण्याचे काम-प. पू. प्राणलिंग स्वामीजी
समाधीमठा गोशाळाला पूजेच्या 5टन ऊस अर्पण
निपाणीतील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रतिसाद
शहरामधील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक दिवाळीनिमित्त आपल्या दुकानात लक्ष्मीपूजन आणि सजावटीसाठी उसाचा वापर करतात. यावेळी हिंदू हेल्प लाईनकडून आणि गोरक्षण सेवा समिती निपाणी यांच्या कडून समाधीमठ गोशाळेसाठी ऊस देण्याचे आवाहनाला निपाणीतील व्यापारी वर्गाला केले होते.

त्याला प्रतिसाद देत 5 टनापेक्षा अधिक ऊस समाधीमठ गोशाळेला निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण करण्यात आला. यावेळी प.पू.प्राणलिंग स्वामीजी बोलते वेळी म्हणाले की भारतीय संस्कृतीत गोमातेला पवित्र मानते जाते गोमतेच्या मानवी जीवनाला अनेक मार्गाने उपयोग होतो म्हणून गाईला गोमाता म्हणून संबोधले जाते. पण आज हिंदू त्यापासून दूर होत चालला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात गाय पुढच्या पिढीला चित्रात दाखवावी लागेल गायीचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेदात गाईला महत्वाचे स्थान आहे. जर घरी गाय असेल तर त्यांना कोणताच त्रास होणार नाही घरातील वातावरण सात्विक राहते. घरो घरी गायी सांभाळल्या पाहिजेत. त्यासाठी जागृती होने देखील तितकेच महत्वाचे आहे. गायीची सेवा करणे सर्वश्रेष्ठ आहे असे मत व्यक्त केले यावेळी गोरक्षण सेवा समिती चे प्रमुख सागर श्रीखंडे हे म्हणाले की वसूबारस दिवशी गोमातेचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.तरुणांनी सणाच्या महत्वाच्या दिवशी गोमतेच्या सेवेला प्रधान्य देऊन ऊस गोळा केला, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. यंदा ही चाऱ्याची टंचाई होणार आहे. पण असे तरुण जर समाजहितासाठी काम करणारे असतील तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असे मत यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.

गोरक्षण सेवा समिती निपाणी चे प्रमुख सागर श्रीखंडे म्हणाले, ‘वसुबारसनिमित्त शेकडो हिंदूंनी सोशल मीडियावर, समाजमाध्यमांद्वारे, शुभेच्छा दिल्या.पोस्ट केल्या; पण गोरक्षण, गोसंवर्धन, गोसेवा करण्यासाठी कृती दिसत नाही ही हिंदूंची शोकांतिका आहे. हिंदू तरुणांनी केवळ फेसबुक, व्हाट्सअप,इन्स्टा, रिल्स या सोशल मीडिया गोमातेवरील प्रेम व्यक्त करून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येकाने कृतीतून आचरणातून प्रत्येकाने गोरक्षण, गो संवर्धन आणि गोसेवा साठी पुढे आले पाहिजे, ज्यांना गोमातेसाठी सेवा करायची असेल किंवा सहकार्य करायचे असेल त्यांनी समाधी मठ गोशाळेला भेट द्यावी अथवा गोरक्षण सेवा समिती यांना संपर्क करावे.यावेळी परिसरातील तरुणांनी केलेल्या या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.

निपाणी समाधी मठ गोशाळेला देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून पूजेचे ऊस व साहित्य गोळा करताना अक्षय रक्ताडे , विकास तोडकर, अभिमन्यू भिलुगडे,कृष्णात रक्ताडे,पांडुरंग जाधव ,विश्वजित जाधव ,संदीप पडळकर,शेखर कोठीवाले,रोहित मोरे,तुषार मोरे, अबिषेक आंबी,दादू मोरे, सौरब अंबी, रितेश सुतार,सूरज सुतार,शिवजित मोरे, यांनी ऊस गोळा करून दिला तर हा ऊस वाहतूक करण्यासाठी राजू कुरणे, सागर श्रीखंडे, मंगीलाल बिश्र्वई यांनी वाहन मोफत उपलब्ध करून दिले या उपक्रमासाठी निपाणी येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण तारळे याचे विशेष सहकार्य लाभले


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.