कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने सदाशिव नगर येथे शाहु भवन व बेळगांव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासाठी अनिल बेनके यांच्याकडुन विशेष सभा
बेळगांव:दिनांक २६ जून २०२४ रोजी बेळगांवातील सदाशिव नगर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या शुभदिनी शाहु भवन व बेळगांव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासाठी अनिल बेनके यांच्याकडुन विशेष सभा घेण्यात आली. यावेळी के.के.एम.पी जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांनी फोटो पुजन केले. के.के.एम.पी पश्चिम बेळगांव तालुका अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले.
<span;>यावेळी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना अनिल बेनके म्हणाले की, केकेएमपी सदस्यत्व मोहीम चालु करण्याची सुचना देण्यात आली, केकेएमपी इमारतीच्या बांधकामासाठी बेळगांवातील सर्व तालुका पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात आला. मराठा समाजातील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नयेत, प्रत्येकाला शिक्षण भेटले पहिजेत.त्याचबरोबर शिक्षण घेत मोफत राहण्याची व जेवणाची सोय झाली पाहिजेत, गोर-गरिब व शिक्षणाला वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यासाठी तसेच निधी संकलनासाठी संभाव्य कमिटींच्या पट्ट्या करुन बेंगळुरच्या मुख्य
कार्यालयाला पाठवुन त्यांची मान्यता घेण्याचे ठरले.
केकेएमपी जागेची लीज वाढवुन घेतल्यानंतर मगील भाडं व इतर गोष्टींची जवळजवळ २ लाख ७५ हजाराची नोटीस आली होती. महापौर व कमिशनर यांना विनंती करुन शेवटी २ लाख ३३ हजार भरायची पावती केली. संस्थेचे ५० हजार वाचविण्याच्या प्रयत्नात ४ महिने गेले. २ लाख ३३ हजार भरुन हे लीज आता १० <span;><span;>वर्षे वाढवुन मिळाली आहे. या संघटने सोबत मराठा समाजाने या जागेबद्दल पुढे समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केला होता. जे काही यातुन उत्पन्न येईल ते गोर गरिब विद्यार्थ्यांसाठी खर्च करता यावा, कोठेही गफला होऊ नये यासाठी सर्वांचा सल्ला घेतला. प्रत्येक तालुक्यातुन आपण किती फंड जमा करु शकतो आमदार, खासदार व एम.एल.सी यांच्याकडुन कीती फंड घ्यायचा याबद्दल चर्चा केली.
<span;>यावेळी के.के.एम.पी जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी चिक्कोडी तालुका अध्यक्ष एस.एस.मोरे, बेळगांव पुर्व अध्यक्ष बसवराज म्यँगोटी, राज्य सल्ला समिती सदस्य अॅड.पी.एम. जगताप, खानापुर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, रामदुर्ग तालुका संचालक पी.एच. जाधव, मोदगा संचालक सदानंद गडद, बैलहोंगल तालुका अध्यक्ष बसवराज यसन्नावर, रामदुर्ग तालुका अध्यक्ष ए.ए.जाधव, सांबरा जिल्हा सहकार्यदर्शी मारुती बी. जोई, खानापुर पदाधिकारी राहुल पवार, बेळगांव पश्चिम तालुका उपाध्यक्ष रोहन युवराज कदम, गोकाक अध्यक्ष प्रविण परशराम कोप्पद, काटकोळ अध्यक्ष पुंडलिक पात्रोट, वक्कलकरडी शिवकुमार शिंदे, आयनापुर सुनिल नारायण डोंगरे व इतर उपस्थित होते.