‘मजदूर नवनिर्मान संघ’ व जागृती महिला वक्कूट संघटनेमार्फत शैक्षणिक, आरोग्यसुविधा, बालविवाह संबंधित गावकऱ्यांमध्ये जागृतीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन गुडनट्टी व आळदाळ गावात पदयात्रा –
‘मजदूर नवनिर्मान संघाच्या’ व जागृती महिला वक्कूट संघटनेच्या वतीने हुक्केरी तालुक्यातील दड्डी जवळच्या गुडनट्टी आणि आळदाळ गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॕ शिवाजी कागणीकर व डाॕ गोपाळ दाभडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली. यावेळी संघटनेतर्फे यल्लाप्पा गस्ती, महानंदा तलवार, सुवर्णा कुठाळे, गुडनट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका बडीगेर मॕडम, आळदाळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुजेरी सर व शाळेच्या शिक्षकांनी दोन्ही गावातील शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
खेडोपाड्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरीब व मागासलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक स्काॕलर्शिप मिळाल्या पाहिजेत, त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या हव्या, योग्य पोषणयुक्त आहार (दुध, अंडी, केळी, चक्की, दररोजचा माध्यान्य आहार व शनिवारचा नाष्टा) व्यवस्थितरीत्या पुरविला गेला पाहिजे, विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य शाळेतर्फे पुरविले पाहिजे, त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखली गेली पाहिजे तसेच गावकऱ्यांना रेशन व्यवस्थित मिळाले पाहिले.
मजदूर नवनिर्मान संघाच्यावतीने बालविवाह पध्दतीबद्दल शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना बालविवाह कायद्याची माहिती दिली गेली व त्याच्या दुष्परिणामाबद्दल गुडनट्टी व आळदाळ गावात फिरून विद्यार्थ्यांना सोबत-घेऊन पदयात्रा काढून गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली. त्याचप्रमाणे स्थानिक प्रायमरी हेल्थ सेंटर (PHC) मधील सर्व सुविधा गावकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत याबद्दल गावात जागृती निर्माण केली.
असे वेगवेगळे (आरोग्य, रेशन, रोजगार, शैक्षणिक, बालविवाह, कुपोषण, महिला-बालकल्याण हक्क, मागासलेल्या समाजाचे शोषण व इतर) सामाजिक प्रश्न घेऊन मजदूर नवनिर्मान संघाचे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गरज लागेल तसे सर्वे करून नोंदी गोळा करतात, गावकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करत आहेत. यासाठी डाॕ शिवाजी कागणीकर, डाॕ गोपाळ दाभडे, समाजसेविका शारदा दाभडे यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मुरकुट्टी, अडिव्याप्पा कुंबरगी, यल्लाप्पा गस्ती, बसवंत कोले, महानंदा तलवार, सुवर्णा कुठाळे, राहुल पाटील व स्थानिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम राबवत आहेत.