बेळगाव: मार्केट पोलीस स्थानकाची मोठी कारवाई करत प्रवाशांना लुटणाऱ्या तीन चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 30 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकातून रायबाग तालुका हरूगिरी येथील मीनाक्षी गोपाळ कुषपन्नावर यांचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. त्यासंबंधी मीनाक्षी यांनी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. दोन वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. रिजवान सिराज पठाण (वय 40 विद्यानगर एपीएमसी बेळगाव) मलिक जन दस्तगीरसाब शेख,(वय 26 मूळचा गोकाक सध्या एपीएमसी ते वास्तव्यास) व विनायक अरुण हिंडलगेकर( वय 32 सध्या राहणार जुने गांधीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून 7 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने सहमूल्यमान वस्तू जप्त करण्यात आले आहेत.
यामध्ये 20 ग्रॅम सोन्याची चेन, 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे मिळून 10 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे .
बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन, पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांनतेश धामन्नावर उपनिरीक्षक केरूळ व सहाय्यक पोलिसांनी ही कारवाई केली.