हिंडलगा कारागृह बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यामुळे तसेच विविध कारणावरून नेहमी चर्चेत असलेले हिंडलगा कारागृह बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीचा फोन आल्या नंतर कारागृह परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कारागृहाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.बंगलोर येथून एका अज्ञात व्यक्तीने हिंडलगा कारागृह बॉम्बस्फोट करून उडवण्याची धमकी दिली आहे.कारागृह अधीक्षक टी.पी.शेष यांना हा धमकीचा फोन आला असून या प्रकरणी त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
धमकीचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आपण जेलमधील कर्मचाऱ्यांच्या परिचयाचे असल्याचे सांगत शेष यांच्या सरकारी नंबरवर फोन करून धमकी दिली आहे.फोन करणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ड गँगस्टर बन्नजे राजाचाही बोलताना उल्लेख केला आहे. तो कारागृहात असताना त्याला मदत केल्याचे देखील धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर सांगितले आहे.
I’m really inspired with your writing talents as well as with the format for your blog. Is that this a paid theme or did you customize it yourself? Anyway stay up the nice high quality writing, it is uncommon to peer a nice blog like this one these days!