श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या श्री दुर्गामाता दौडीतला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.हजारो तरुण तरुणी दौडीत सहभागी झाले होते.
शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून दौडीला प्रारंभ झाला.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन करून दौडीला प्रारंभ करण्यात आला.पहिल्या दिवशीच्या दौडीत हजारो धारकरी आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या. दौडीच्या अग्रभागी भगवा ध्वज हातात घेतलेला तरुण होता.दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.अनेक ठिकाणी दौडीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.दौडीत धारकरी भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते.तरुणींनी देखील भगवे फेटे परिधान केले होते.पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त दौडिच्या दरम्यान ठेवला होता.कपिलेश्वर मंदिर येथे पहिल्या दिवशीच्या दौडीची सांगता झाली.