हा नाला सफाई करण्याची आहे गरज
शास्त्रीनगर येथील नाला सफाई करण्याची गरज आहे.कारण या नाल्यांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा अडकला असून येणारा पावसाळ्यात नाल्यातून सर्व पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे तसेच नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
शास्त्रीनगर येथील नाल्यात प्लास्टिक कचरा झाडेझुडपे तसेच झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात साचल्या आहेत. त्यामुळे येथील कचरा लवकरात लवकर काढून नाला साफ करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात येते. मात्र आता मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी नाल्याच्या साफसफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे.
तसेच संपूर्ण कचरा अडकला असून या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे देखील मुश्किल झाले आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.