शैक्षणिक क्रांतीशिवाय पर्याय नाही: प्रा. मधुकर पाटील
बेळगाव:
मजबूत आणि सक्षम भारत निर्माणसाठी शैक्षणिक क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे मत सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा. मधुकर पाटील यांनी व्यक्त केले.उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी या विषयावर गुरुवर्य वाय.एन. मजूकर फाउंडेशन चा दुसरा वर्धापन दिन आणि अभिष्टचिंतन कार्यक्रमात व्याख्याते या नात्याने ते बोलत होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व्याख्याते मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री चांगळेश्वरी देवी फोटोचे पूजन कांचन मजुकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाय.एन. मजुकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने व्याख्याते मधुकर पाटील यांचा शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना वाय.एन. मजुकर सर म्हणाले , महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागाची निवड केली आहे. शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी फाउंडेशनची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले.https://dmedia24.com/the-grand-procession-of-the-ramnavami-on-the-occasion-of-ramanavami/
यावेळी बी. बी. पाटील, प्रसाद मजुकर , सी.एम. गोरल यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला बबन कांशिडे, डॉक्टर तानाजी पावले , नरेंद्र मजुकर , बळीराम देसुरकर, चेतन हुंदरे, शांताराम कुगजी, चंद्रकांत पाटील, आनंद मजुकर, दौलत कुगजी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.