पकडलेल्या सापाला सोडताना दंश केल्याने त्या सापाला बरणीत घालून उपचार घेण्यासाठी युवकाने जिल्हा रुग्णालय गाठले.जिवंत साप घेऊन उपचारासाठी आलेला तरुण पाहून जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी देखील घाबरून गेले होते.
हुंच्यानट्टी गावातील शाहीद या तरुणाच्या घराजवळ साप आला होता.त्यावेळी धाडसाने शाहीद याने सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडण्यासाठी तो निघाला होता यावेळी सापाने शाहिदला दंश केला.दंश केल्यावर देखील शाहीद याने घाबरून न जाता तो साप आणला आणि बरणीत घालून त्याने मित्रासोबत जिल्हा रुग्णालय गाठले.
दंश केलेला जिवंत साप घेऊन उपचारासाठी रुग्ण आलाय ही बातमी कळताच लोकांनी तेथे गर्दी केली होती.कोणता साप चावलाय हे समजले तर उपचार घेणे सोपे होईल म्हणून साप दाखवण्यास घेऊन आलो असे शाहिदने सांगितले.उपचार घेऊन शाहीद आपल्या मित्रांसोबत निघून गेला.