बैलहोंगल तालुक्यातील तिगडी जलाशयात मगर आढळून आल्याने तेथील लोकात आणि शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुसळधार पावसामुळे मगरी पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहून येत आहेत.शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मगर दिसली.नंतर त्याने मगर जलाशयात फिरत असल्याचे अन्य शेतकऱ्यांना सांगितले.
सध्या शेतीची कामे सुरू आहेत पण मगर फिरत असल्याची बातमी सगळीकडे पसरल्याने शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. तिगडी जलाशयाच्या चारही बाजूला शेती आहे.शेतात जाताना आणि काम करताना सावधगिरी बाळगा असा इशारा ग्राम पंचायतीने दिला आहे.वनखात्याने जलाशयात फिरत असलेल्या मगरीला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.