जीवनाला कंटाळून स्वतःला मार्कंडेय नदीत अर्पण करणाऱ्या गांधीनगरच्या वृध्दाचे उचगावच्या दोन युवा कार्यकर्त्यांनी मन परिवर्तन प्राण वाचविले –
आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उचगावजवळ मार्कंडेय नदीच्या पात्रात उडी मारून आपले जीवन संपविणाऱ्या गांधीनगरच्या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे मनपरीवर्तन करून प्राण वाचविले.
हिंडलगा सुळगा येथील विशाल ॲटो गॕरेजचे मालक विशाल हंडे (उचगाव) आणि समाजसेवक यतेश हेब्बाळकर (अतिवाड) हे दोघे उचगावहून जाताना एक वृध्द व्यक्ती मार्कंडेय नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून काही महिला आरडाओरडा करताना गाडीवरून जाताना दोन्ही युवकांनी पाहिला व त्वरित घटनास्थळी धाव घेऊन सदर तुकाराम नामक व्यक्तीजवळ जाऊन त्यांना जीव देण्यापासून परावृत्त करत बाजूस नेले.
विशाल व यतेशनी सदर वृद्धाची विचारपूस करताना ही व्यक्ती जीवनाला कंटाळून आपण आत्महत्या करत होतो असे तुकाराम यांनी सांगितले. तेव्हां समाजसेवक यतेश हेब्बाळकर यांनी गांधीनगर येथील आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सदर व्यक्तीच्या घरच्यांशी संपर्क साधला व तुकाराम यांचे आत्महत्या करण्यापासून मनपरिवर्तन करत, त्यांच्या मुलांना आपल्या वडीलांची उतारवयात काळजी घेण्यासंदर्भात समजावले.