युवकाने मानले विजय मोरे यांचे मानले आभार
पंधरा दिवसांपूर्वी सोमनाथ पेट्रोल पंप पिरनवाडीसमोर मोठा अपघात झाला होता. त्यात तीन जण जखमी झाले होते, त्यातील एक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. यावेळी माजी महापौर आणि त्यांच्या पत्नी मारिया मोरे हे त्या मार्गाने जात असताना त्यांना जखमी अवस्थेत पाहताच त्यांनी त्यांना त्यांच्या रुग्णवाहिकेत बसवून वेणुग्राम रुग्णालयात दाखल केले.
त्या नंतर त्यांनी जखमींची माहिती एकत्रीत केली असता त्याचे नाव निरंजन माने असून तो अशोक लोखंडी वर्क्समध्ये काम करतो अशी माहिती मिळाली.नंतर निरंजनला विजया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
विजया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निरंजन माने यांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी माजी महापौर विजय मोरे यांना फोन केला आणि ज्यांनी मदत केली, त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि आठ दिवसांनी विजय मोरे आणि अॅलन मोरे यांनी विजया हॉस्पिटलला भेट दिली. आणि त्याची चौकशी केली.
जखमी झालेल्या निरंजन माने यांनी माजी महापौर विजय मोरे यांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानले .यावेळी अशा परिस्थितीत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, अशी विनंती विजय मोरे यांनी सर्वांना केली.