हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच आले गुंडाळण्यात
सुवर्ण सौध येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन दिवस पूर्ण होण्याआधीच एक दिवस आधीच गुंडाळण्यात आली आहे. सदर हिवाळी अधिवेशन ची सांगता शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी होणार होती मात्र निर्धारित वेळापत्रका आधीच एक दिवस आधीच या हिवाळी अधिवेशन ची सांगता करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात असणारे अनेक नेते काही कारणास्तव या अधिवेशन ला अनुपस्थित दर्शवत आहेत त्यामुळे खुद्दसभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बऱ्याच मंत्र्यांविरोधात सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी त्यांनी आज ही घोषणा केली असून उद्या शुक्रवारी सभागृहातील बहुतांश सदस्यांची प्रतिबद्धता असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम ठरले असल्यामुळे एक दिवस आधीच त्यांनी अधिवेशन समाप्तीची घोषणा करून याबद्दल स्पष्टता दिली आहे
तसेच शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या स्वागताच्या तयारी करिता अनेक नेते व्यस्त आहेत त्यामुळे अधिवेशनाकरिता कोणीही येणार नसल्याचे गृहीत धरून त्यांनी अधिवेशन समाप्तीची घोषणा केली आहे.