इंडॉल कंपनीच्या विरोधात यमुनापूर येथील ग्रामस्थांनी काढला मोर्चा
यमनापुर येथील ग्रामस्थांनी इंडॉल कंपनीच्या विरोधात मोर्चा काढून जमिनी घेतलेल्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी केली.यमनापुर गावापासून इंडॉल कंपनी पर्यंत मोर्चा काढण्यात आला.
इंडॉल कंपनीसाठी यमनापुर गावातील अनेकांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत.आता कंपनी सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरीही जमिनी घेतलेल्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.इंडॉल कंपनीने त्वरित यमनापुर ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चात मोठ्या संख्येने यमनापुर ग्रामस्थ सहभागी झाले होते.हमारी मांगे पुरी करो अशी घोषणाबाजी मोर्चात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी दिल्या.जमिनी गेल्या तर जगायचे कसे,स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्या,पुनर्वसन आंदोलन असे फलक मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी हातात धरले होते.वारंवार आश्वासन देऊन देखील त्याची पूर्तता केली जात नाही.आमच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी भूमिका यमनापुर ग्रामस्थांनी घेतली.पोलिसांनी अखेर तोडगा काढण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.