“विज्ञान आणि पर्यावरण यात पारंपारिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर आवश्यक”–प्रा.एस्.वाय.प्रभू
जी.एस्.एस् मध्ये विज्ञानदिन साजरा.
बेळगांव,ता.२८: बेळगांव येथील जी.एस्.एस् महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.एस्.के.ई.सोसाइटीचे उपाध्यक्ष व प्राणिशास्त्राचे प्रा.एस्.वाय.प्रभू प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात पारंपारिक ज्ञान,रोजच्या जीवनात आचरणात येणारे विज्ञान ,कुंभमेळाव्यात दिसलेले विज्ञान आणि पर्यावरणीय ज्ञानाचा एकमेकांशी सुरेख मेळ घातला.लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कार करत पर्यावरणाचा -हास रोखणं कसं गरजेचं आहे ते सोदाहरण स्पष्ट केले.https://dmedia24.com/kore-gali-shahpur-punch-and-youth-committee-border-conduct-marathi-language-day/
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य अभय सामंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना शीतपेय,दूध,इतर खाद्य पदार्थ व रोजच्या वापरातील जीवनोपयोगी वस्तूमध्ये शुद्धता तपासून घेण्याची गरज व्यक्त केली.सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.संदीप देशपांडे यांनी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करून विज्ञान दिनाचे महत्त्व विषद करताना स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये झालेल्या विज्ञान संशोधनाचा आढावा घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चारूशीला बाळेकाई यांनी केले तर प्रा.विनया पित्रे यांनी आभार प्रदर्शन केले. https://www.instagram.com/reel/DGmqv7EhhT9/?igsh=MTZhcGpvdTc3bGpqOQ==
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित होते.