एकसंबा गावात बुधवार, १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी दोन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. वेदांत संजू हिरेकुडे (९ वर्ष) आणि मनोज काशिनाथ कल्याणी (८ वर्ष) ह्या दोन मुलांनी बागेवाडी यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांनी जीव गमावला आहे.
सकाळी रंगपंचमी खेळून घरी परतल्यावर वेदांत आणि मनोज अंघोळीसाठी विहिरीकडे गेले. उशिरापर्यंत मुलं घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. शेताजवळील विहिरीकडे मुलांचे कपडे, चप्पल आणि बादली सापडल्याने संशय निर्माण झाला. स्थानिक युवकांनी विहिरीत शोध घेतल्यावर दुपारी वेदांतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीत भरपूर पाणी असल्याने मनोजचा शोध अवघड ठरले. सदलगा अग्निशमन दल आणि औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी विहिरीचे पाणी काढून संयुक्त प्रयत्न केल्यावर सायंकाळी मनोजचाही मृतदेह सापडला.
वेदांतचे वडील भारतीय सैन्यात सेवारत असून तो केरूर गावाचा मूळ रहिवासी होता. शिक्षणासाठी तो एकसंबा येथे आजोबांच्या घरी राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ आहे. मनोजचे वडील यापूर्वीच वारल्यामुळे आई, बहीण आणि आजी यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचेही मृतदेह एकसंबा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना परत देण्यात आले. वेदांतचा मृतदेह केरूरला नेण्यात आला तर मनोजचे अंत्यसंस्कार एकसंबा येथे करण्यात आला.
सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या सहा तासांच्या शोधमोहिमेदरम्यान गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. रंगपंचमीच्या आनंदाच्या दिवशी ही शोकांतिका झाल्याने गावातील लोक स्तब्ध झाले आहेत. सदलगा पोलीस ठाण्याने पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
https://dmedia24.com/the-accused-are-strictly-punished-for-the-rape-case/