दोघा चोरट्याने फिल्मी स्टाईलने दरोडे घालण्याचा केला प्रयत्न
शाहूनगर येथे दोघा चोरट्याने फिल्मी स्टाईलने दरोडे घालण्याचा प्रयत्न केला या चोरी प्रकरणात त्यांनी दुकान मालक यांच्या डोक्यावर बंदुकीने वार करून जखमी केले आणि तेथून पळ काढला.
सदर घटना आज सकाळी दहाच्या सुमारास शाहूनगर येथील संतोषी ज्वेलर्स मध्ये घडली. यावेळी दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानात दरोडे घालण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत होनराव यांच्या मालकीचे शाहूनगर येथे संतोषी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे यावेळी त्यांनी सकाळी दुकान उघडताच त्यांच्या मागून दोन चोरटे आले. आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या डोक्यात वार केला.
त्यावेळी दुकान मालक प्रशांत होनराव हे जखमी झाल्याचे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशांत होनराव यांच्यावर उपचार सुरू असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
तसेच प्रशांत हे रोजच्या प्रमाणे दुकान सुरू करण्याकरिता गेले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला मात्र यावेळी चोरट्यांचा प्लॅन फसला म्हणून त्यांनी तेथून पळ काढला. यातील एका व्यक्तीने हेल्मेट घातले होते.