This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*शिल्लक कारणावरून दोघा भावांनी घेतले युवकाचे प्राण*

*शिल्लक कारणावरून दोघा भावांनी घेतले युवकाचे प्राण*
D Media 24

शिल्लक कारणावरून दोघा भावांनी घेतले युवकाचे प्राण

दोघा सख्या भावांनी एका युवकाला भांडणांमध्ये गटारीत ढकलल्याने एक युवक गटारीत पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कॅम्प परिसरात घडली आहे.

शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावाने एका युवकाला भांडणामध्ये गटार मध्ये ढकलून दिले. घटना शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अँथोनी स्ट्रीट कॅम्प येथे घडली. या घटनेत एरिक्स स्वामी अलेक्झांडर अंथोनी वय 25 राहणार अंथोनी कॅम्प हा युवक मृत झाला आहे.

तर दोघे सख्खे भाऊ यातील एक जस्टिन वय १८ आणि त्याचा 17 वर्षाचा भाऊ या दोघांनी अरे स्वामी यांना भांडणांमध्ये गटारीत ढकलून दिले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एरिक्स स्वामी व खुनातील संशयित एकाच परिसरात राहतात शनिवारी या प्रकरणातील अल्पवयीन युवक रस्त्यावर विनाकारण शिव्या देत थांबला होता रस्ताने जाणारे एक आणि त्याला हटकवून उगीचच का शिव्या देत थांबला आहेस घरीच असे सांगितले त्यानंतर तो शिव्या देतच होता नेमक्या आरिकसस्वामीच्या घराजवळच हा प्रकार सुरू होता.

त्यानंतर अरिक स्वामी याला घराबाहेर बोलावून घेत माझ्या भावाला का ओरडला असे म्हणत पुन्हा वाद घातला यातून एकमेकांच्या अंगावर धावून जात मार बडव सुरू झाली यावेळी धाकट्या भावाने आरिक स्वामीला ढकले तो गटारी जाऊन पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने अरिकस्वामीचा रात्री 1:45 च्या सुमारास मृत्यु झाला.

या घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात करण्यात आली असून अल्पवयीन युवकांच्या बालसुधारणागृहात 18 वर्षाच्या भावाची कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकाचे अल्ताफ मुल्ला काम पाहत आहेत


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

1 Comment

Leave a Reply