*कचरा उचलायची बंद पडलेली गाडी पुन्हा सुरू*
_कंग्राळी खुर्द गावामध्ये मागील 45 दिवसापासून घरोघरी जाऊन कचरा गोळा करायची गाडी काही कारणास्तव बंद पडली होती. पण आज ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पुन्हा ती गाडी चालू करण्यात आली. कचरा गाडी गावात न आल्याने अनेकांनी ठिकठिकाणी कचरा टाकून दुर्गंधीचे वातावरण निर्माण केले आहे याचा परिणाम लहान मुलांच्या प्रकृतीवर होत आहे. तसेच कचरा गाडीत देताना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून देऊन त्यांना सहकार्य करावे. तसेच कोणी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा आणखीन मोकळ्या जागेत कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर ग्राम सुधारणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच काही अडचण असल्यास किंवा तक्रार असल्यास खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा_.
वैजु बेन्नाळकर – 80503 99501
विनायक कम्मार – +919972448026
*ज्या पद्धतीने आम्ही सरकारी मोफत योजनांचा लाभ घेण्यासाठी आसुसलेलो असतो अगदी त्याच पद्धतीने कचरा गाडीचे पैसे सुद्धा जमा करून सहकार्य करायचे आहे* कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा एक मोठा खर्च आहे तरी गावातील सर्व सुज्ञ नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे