भक्तिमय वातावरणात तिसऱ्या दिवशीच्या दौडीची सांगता
तिसऱ्या दिवशीच्या दौडची सुरुवात अनगोळ येथील शिवाजी कॉलनीपासून सुरू झाली यावेळी येथील श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली त्यानंतर डॉक्टर श्री दामोदर वागळे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडी ला सुरुवात करण्यात आली.
यावेळी दौडी मध्ये भगवे फेटे भगवेध्वज पांढरा सदरा अनेकांनी परिधान केला होता तसेच दगडीच्या मार्गावर महिलांनी रांगोळी आणि फुलांचा सडा टाकला होता तसेच सुहासिनी महिला देखील आरती घेऊन दौडीच्या स्वागताकरिता उभ्या होत्या.
त्यानंतर ही दौड महर्षी रोड ,पहिला गेट ,शुक्रवार पेठ, सोमवार पेठ ,आरपीडी क्रॉस मार्गे अनगोळ येथे पोहोचली .यावेळी संपूर्ण अनगोळ भाग फिरवून लक्ष्मी गल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे आरती करण्यात आली त्यानंतर ध्येय मंत्र म्हणून सीपीआय परशराम पुजारी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
यावेळी दौडीच्या मार्गावर अनेक चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंची वेशभूषा साकारली होती. यावेळी एकूणच तिसऱ्या दिवशीची दौड आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.