पाहुणा बनून चोरट्याने लुटले लाखो रुपये
महावीर भवन मंगल कार्यालय येथे काल एक विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यात एक महिला पुरुष आणि लहान मुलीने खुर्चीवर ठेवलेली पर्स त्यामध्ये असलेले दीड तोळे असलेले सोन्याचे दागिने आणि नातेवाईक मित्रमंडळांनी दिलेले आहेरची पाकिटे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की शिंदोडी येथील नंदकिशोर अजरेकर यांच्या मुलाचा विवाह काल महावीर भवन येथे पार पडला यावेळी मंगल कार्यात पाहुणे मंडळांसह सर्वजण घाई गडबडीत असल्याचा फायदा घेत आलेल्या भामट्यांनी हातामध्ये असलेले रोख रक्कम व दागिने असलेली पर्स उचलून तेथून उभारा केला.
नवरदेवाची आई रेणुका यांनी नातेवाईकांसोबत फोटो काढण्यासाठी आपल्या हातात मधील रोख रक्कम दागिने असलेली पर्स खुर्चीवर ठेवली असता भामट्याने या संधीचा फायदा घेत तेथून पर्स लंपास केली यावेळी सर्वांनी तेथे शोधाशोध केली असता पर्स सापडली नाही.
त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये फुटेज पाहिले असता एक महिला पुरुष आणि लहान मुलगी पर्स घेऊन मंगल कार्यालयाच्या बाहेर पडताना आजची छबी कैद झाली आहे याप्रकरणी त्यांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली असून पोलीस याचा शोध घेत आहेत
ee1vq0