बिडी येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
खानापूर तालुक्यातील बिडी येथे गुरुवारी (२८ मार्च) संध्याकाळी एका वृद्ध दाम्पत्याची मृत्यूमुखी पडलेली शवे सापडली आहेत. स्थानिक ख्रिश्चन गल्लीमध्ये राहणाऱ्या ८३ वर्षीय डायगो संतान नाझरेथ आणि त्यांच्या ८० वर्षीय पत्नी फ्लेविया डायगो नाझरेथ यांचे मृतदेह रात्री ८ वाजता शेजाऱ्यांच्या नजरेस आले . तपासणी दरम्यान, फ्लेविया घरातच मृत पडलेल्या अवस्थेत आढळला. तर डायगोचे शव घराजवळील पाण्याच्या टाकीत रक्तबंबाट झालेल्या अवस्थेत सापडले.
घटनेची बातमी मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. या काळात त्यांना इंग्रजी भाषेतील एक आत्महत्येची चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये डायगो यांनी जानेवारीपासून एका फसव्या व्यक्तीकडून सततच्या धमक्यांबद्दल उल्लेख केला होता. त्या व्यक्तीने स्वतःला दिल्लीतील बीएसएनएलचा अधिकारी सांगितले होते आणि डायगो यांच्या सिमकार्डचा गैरवापर झाल्याचा खोटा आरोप करून त्यांना ‘डिजिटल अटक’ होणार असल्याची भीती दाखवली होती. अशा प्रकारे, या फसवणूकीतून सुमारे ५ ते ६ लाख रुपये बळकावले गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्राथमिक तपासानुसार, या फसवणुकीमुळे झालेल्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. डायगो यांनी प्रथम गळ्यावर धारदार हत्याराने वार करून घेतला. प्राण न गेल्याने पाण्याच्या टाकीत उडी घेतली, तर फ्लेविया यांनी विषप्राशन केल्याचे निष्कर्षात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला मोबाइल फोन, धारदार हत्यार आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. मृतदेह खानापूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, डायगो यांनी आपली शवे वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याची इच्छा चिठ्ठीत व्यक्त केली होती. त्यानुसार, नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलला दान केले आहेत. https://dmedia24.com/vidya-bharat-belgaum-district-level-pre-meeting-enthusiasm/
डायगो संतान नाझरेथ महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयातून निवृत्त झालेले अधिकारी होते. फसवणूकीच्या या घटनेमुळे वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या मानसिक अत्याचाराची चर्चा सध्या समाजात सुरू आहे. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या फसवणाऱ्याच्या शोधात तपास करत आहेत.