गढवांची जगण्यासाठी धडपड
विनायक नगर येथील महानगर पालिकेच्या हद्दीत काही गाढवांचा मृत्यू झाला आहे, तर काही अजूनही जगण्यासाठी धडपडत आहेत. तर काही गाढवे आहेत ज्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, असे विनायक नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
बेळगाव महानगर पालिका म्हणजे सिटी कॉर्पोरेशनला त्यांच्या परिसरात असहायपणे फिरत असलेल्या गाढवांसाठी योग्य निवारा आणि अन्नाची सोय करण्याची विनंती केली आहे.
विनायक नगर, सिंधी कॉलनी, जय नगर, विजय नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाढवे दिसल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत .विनायक नगर आणि परिसरात विविध ठिकाणी फिरत असलेल्या त्यांना कोणी सोडले, हेच समजेनासे झाले आहे.
यावेळी हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला असताना काही अज्ञात व्यक्तींनी विनायक नगरमध्ये सुमारे 20 ते 22गाढवे सोडल्याची माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्या गाढवांना खायला अन्न आणि प्यायला पाणी नव्हते. त्यापाठोपाठ दोन गाढवांचाही मृत्यू झाला आहे,
विनायक नगर हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत येत नाही, ती महानगर पालिकेच्या हद्दीत येते, त्यामुळे या समस्येवर ते काहीही करू शकत नाहीत. पण त्यांनी अधिकार्यांना सांगण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
रस्त्यावर गाढव फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. अंधाराच्या वेळी या गाढवांमुळे रस्त्यावर अपघात होऊ शकतात, असे ते म्हणाले.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नागेश माने यांनी उपायुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लवकरात लवकर गाढवांना निवारा व अन्न उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ संजय दुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या समस्येकडे पशुवैद्यकीय विभागाने लक्ष द्यावे. आणि बेळगाव येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सहाय्यक संचालक डॉ.आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे अशी माहिती दिली आहे.