राज्याचा अर्थसंकल्प जारी -मद्य (दारू )दरात होणार लक्षणीय वाढ
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला.यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विभागाकरिता तरतुदी जारी केल्या आहेत.काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजनांसाठी 52,000 कोटी रुपये आणि ब्रँड बेंगलोरसाठी 45,000 कोटींची तरतूद. इंदिरा कॅन्टीन्ससाठी 100 कोटी रुपये, नम्म मेट्रोसाठी 30,000 कोटी रुपये, अन्नभाग्य योजनेवर दरसाल 10 हजार कोटी खर्च केले जातील. ज्याचा फायदा 4.42 कोटी बीपीएल धारकांना होणार आहे.
तसेच 40 लाख बीपीएल कुटुंबीयांना 10 किलो अन्नधान्य खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 1.680 कोटी रुपये खर्च केले जातील असे सांगितले आहे.सरकारकडून ई-कॉमर्स डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचासाठी अपघात विम्याची घोषणा केली आहे.
भारतीय बनावटीच्या विदेशी दारू (आयएमएल) वरील अतिरिक्त अबकारी करात 20 टक्क्यांनी वाढ केली जाणार तर बियर वरील अतिरिक्त अबकारी कर 175 वरून 185 टक्के वाढविण्यात येईल. अंदाजे 3,27,747 कोटी रुपये खर्चाच्या या अंदाजपत्रकामध्ये 2,50,933 कोटी रुपयांचा महसूल खर्च, 54,374 कोटी रुपयांचा भांडवली खर्च आणि 22,441 कोटी रुपयांची कर्ज परतफेड करण्याची तरतूद केली आहे.
राज्यभरातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत अंडी दिली जातील. सरकार स्थावर मालमत्तांचे मार्गदर्शन मूल्य वाढवणार. मद्य अर्थात दारूच्या दरात लक्षणीय वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.