अस्वल दिसल्याने गावात भीतीचे वातावरण
कलघटगी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर अस्वल दिसल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कलगटगी येथे सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांना अस्वल दिसले अस्वल पाहणाऱ्या तरुणांनी आपल्या मोबाईल मध्ये अस्वलची छबी कैद करून घेतली.
त्यानंतर ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे हे अस्वल पाण्याकरिता इतरत्र भटकत गावामध्ये आले होते.
येथील डोंगराळ भाग असलेल्या कलघटगी तालुक्यात पानवठे कोरडे पडले आहेत गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने पाण्याचा दुर्भिक्ष जाणवत आहेत. त्यामुळे सर्व प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत असल्याचे मत प्राणी तज्ञांनी व्यक्त केले आहे.