दुसऱ्या दिवशीच्या दौडला चनम्मा सर्कल येथून झाली सुरुवात
दुसऱ्या दिवशीच्या दौडला चनम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरापासून सुरुवात झाली यावेळी प्रेरणा मंत्र म्हणून आणि गणेशाची आरती करून दवडीला चालना देण्यात आली. यावेळी डीसीपी अरुण कुमार कल्लूर तसेच नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.
त्यानंतर ही दौड शहराच्या विविध गल्ली मधून निघाली यावेळी जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय असा नारा देत दुसऱ्या दिवशीची दौड खडक गल्ली चव्हाट गल्ली संपूर्ण शिवाजीनगर गांधीनगर भागातून निघून गांधीनगर येथे फिरली.
यावेळी गांधीनगर येथे शिवराज्याभिषेक डोळ्याचा अत्यंत सुंदर देखावा सादर करण्यात आला होता. शिवाजीनगर येथे महिला मंडळांनी आरती करून दौडचे स्वागत केले.
त्यानंतर ही दौड श्री दुर्गादेवी मंदिर किल्ला येथे पोहोचली यावेळी या ठिकाणी महार रेजिमेंटच्या पतीने दुर्गामाता दवडीचे स्वागत करण्यात आले यावेळी कर्नल विक्रम सिंग संकला तसेच एसीपी बर्मनी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला आणि दुसऱ्या दिवशीच्या दौडची सांगता करण्यात आली.
तिसऱ्या दिवशीची दौड
शिवाजी कॉलनी येथून प्रारंभ होऊन लक्ष्मी माता मंदिर अनगोळ येथे समाप्त होणार आहे.