पुणे बंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक जागीच ठार झाला.रिक्षाला धडक दिल्यावर कंटेनर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.अपघातात रिक्षाचे नुकसान झाले.
कंटेनरची धडक जोरदार असल्याने रिक्षा चालक रिक्षातून बाहेर फेकला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.अपघातात मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव अमीन यरगट्टी (४५) असे असून तो हिरे बागेवाडी येथून भाजी घेऊन बेळगावला निघाला होता.
त्यावेळी भरधाव कंटेनरने जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.अपघात झाल्यावर रिक्षातील भाजीची पोती रस्त्यावर विखुरली होती. अपघाता नंतर कंटेनर चालकाने पलायन केले.अपघाताचे वृत्त कळताच हिरे बागेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.