तब्बल सहा तासांनी झाली सुटका
आज तब्बल सहा तासानंतर पाच वाजण्याच्या सुमारास मराठी भाषिकांना महामेळावा संदर्भात पोलिसांनी अटक केलेल्यां कार्यकर्ते आणि महिलांची सुटका केली.
नेहमी कर्नाटक शासनाच्या दडपशाही खाली मराठी भाषिकांना वावरावे लागते.
याविरुद्ध निषेध करण्याकरिता आज व्हॅक्सीन डेपो इथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याही ठिकाणी कर्नाटक शासनाची धडपशाही मराठी माणसाला सहन करावी लागली .
यावेळी मेळावा करिता येत असलेल्या मराठी बांधवांची अडवणूक करण्यात आली तसेच व्हॅक्सिन डेपो परिसरात 144 कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वांना अटक करून त्यांना एपीएमसी पोलीस स्थानकात डांबले .
यावेळी अटक करून स्थानबद्धतेत ठेवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली.
मात्र या आधी अटक झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात सत्याग्रह केला तो म्हणजे अन्न सत्याग्रह. आणि त्यांनी उपोषण करून कर्नाटक सरकारने पुन्हा मराठी माणसांवर केलेल्या दडपशाहीचा या ठिकाणी तीव्र निषेध केला.