बेळगाव: शहरातील खडेबाजार येथे घडलेल्या गोव्याच्या माजी आमदाराचा खून प्रकरणानंतर बेळगाव मध्ये खळबळ उडाली होती. फोंड्याचे माजी आमदार मृत मामलेदार यांचे नातेवाईक बेळगाव येथील शवगृह येथे दाखल झाले होते.
त्यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार
केपीसीसी सदस्य आणि मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांनी मृत लवू मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.