कपिलेश्वर मंदिर मागील तलावाचा प्रश्न लागला मार्गी
बेळगांव :अखेर कपिलेश्वर मंदिर मागील असलेल्या तलावाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येथील वास्तव्यास असलेले गोडसे कुटुंबीयांनी जागेचे हस्तांतर महापालिकेकडे केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.
https://fb.watch/hqGWos3uyU/
यावेळी तलावाच्या जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे आमदार अनिल बेनके यांच्याकडे गोडसे कुटुंबीयांनी सुपूर्द केली. येथील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावाच्या संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत होती तसेच येथील रस्त्याचा काही भाग देखील कोसळला होता त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचे ठरले होते.
गेल्या सात वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. येथील भिंतीची डागडुजी करण्यात यावी आणि रस्त्याचा मार्ग प्रश्न मार्गी सुटावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती.
मात्र सदर भिंत आणि रस्त्याची जागा ही गोडसे कुटुंबियांकडे असल्याने ती रखडली होती मात्र आमदार अनिल बेनके यांनी गोडसे कुटुंब यांची भेट घेऊन आपल्याला सहकार्य करण्याची विनंती केली त्यानुसार त्यांनी सहकार्याची भूमिका घेत तलाव रस्त्याची डागडुजी करण्यास परवानगी दिली आहे
त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आत्ता मार्गी लागला असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी गोडसे कुटुंबीयांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे तलावाच्या जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे सोपविली त्यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे,कपिल भोसले तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.