बेळगाव:आपल्या हिंदू समाजातील मुलींनी लव जिहाद पासून कसे दूर राहिले पाहिजे व स्वतःचे रक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे.लव जिहाद घडलेले प्रकरणांची माहिती या पुस्तकांमध्ये लव जिहाद पुस्तक प्रकाशन वेळी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी वक्तव्य केले.https://dmedia24.com/on-behalf-of-the-bajrang-dal-on-sunday/
कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन मध्ये श्रीराम सेनेच्या वतीने लव जिहाद या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर श्रीराम सेना संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक व राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते लव जिहाज या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी प्रमोद मुतालिक बोलताना म्हणाले की श्रीराम सेना ही हिंदू मुलींना संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.त्यासाठी राज्यात व हेल्पलाइनची सुरुवात करण्यात आली. असून 24 तास ही सेवा सुरू असणार आहे. या सेवेतून आणि अनेक हिंदू मुलींना लव जिहाद सारख्या प्रकरणातून आपण बाहेर काढले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बेळगाव जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, भाग्यश्री कोकितकर यांच्यासहित श्री रामसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.