138 पौरकर्मिक सफाई कर्मचाऱ्यांना वेतन दिले नसल्याने त्यांनी आज वेतन मिळावे याकरिता आंदोलन छेडले.जवळपास तीन-चार महिन्यांपासून पगार दिले नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज तीव्र आंदोलन छेडले आणि आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी यावेळी केली.
यावेळी बोलताना उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी या सर्व सफाई कामगारांना कोणत्या कंत्राटदारांनी काम दिले आहे हे सर्व शोधणे गरजेचे आहे. याकरिता पोलीस प्रशासन कामाला लागले असून लवकरात लवकर संबंधी सर्व निष्कर्ष आपल्यापुढे येतील असे सांगितले.
या वर्षभरापासून कंत्राट बेसवर या 138 कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जात आहेत मात्र आता कंत्राटदाराने केलेल्या मनमानी कारभारामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
सर्व सफाई कर्मचारी आपले बेळगाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करतात त्यामुळे जे कोणी काम केले आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे आणि सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत पगार लवकरात लवकर दिले पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असेल असे यावेळी बोलताना आमदार सेठ म्हणाले