फक्त समितीच्या निष्ठेने हळदी कुंकू समारंभात हजारो महिलांची उपस्थिती
मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा समारंभ न भूतो न भविष्यती असा ठरला यावेळी महिलांची उपस्थिती डोळ्याचे पारणे फेडणारी होती.
ना कुकर ना मिक्सर ना कोणता फ्रिज ना कोणताही एक रुपया काहीही नसताना या सर्व महिला फक्त समितीच्या निष्ठेने हळदी कुंकू समारंभात उपस्थित झाल्या होत्या.
यावेळी या हळदी कुंकू समारंभात मराठी माणसाचा स्वाभिमान निदर्शनास आला. यावेळी सर्व महिलांनी समितीला विजयी करण्याचा निर्धार या हळदी कुंकू समारंभात केला.
महिलांनी दिलेल्या या प्रतिसादाला राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली. अनेक राष्ट्रीय पक्ष विविध भेटवस्तू आणि अमिष दाखवून मिळावे आणि कार्यक्रम भरवत आहेत मात्र फक्त मराठी स्वाभिमानामुळे आणि समिती निष्ठेला जागून सर्व महिलांनी उपस्थिती दर्शविल्याने समितीच्या पंखांमध्ये दहा हत्ती म्हणण्यापेक्षा लाखो हत्तींचे बळ मिळाले आहे.
यावेळी महिलांची लक्षणीय संख्या पाहून समितीने त्यांच्याही भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी या समारंभात जवळपास हजारो महिलांनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला .
सदर हळदीकुंकू समारंभ रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शहरातील मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे पार पडला.
यावेळी या हळदीकुंकू समारंभास सीमा भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.