बेळगाव जिल्ह्यातील अथणी बस स्थानकावर तरुणी आणि महिलांच्या समोर अर्धनग्न अवस्थेत रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.
अथणी बस स्थानकावर एक तरुण शर्ट काढून बसमध्ये चढून महिला आणि तरुणी यांच्यासमोर रिल तयार करून त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील लगेच केले.ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी बस स्थानकावर फिरत असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले.तेथे पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यामुळे त्या तरुणाने आपण तरुणींच्या वर इम्प्रेशन मारण्यासाठी शर्ट काढून रिल करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याची कबुली दिली.
त्या नंतर पोलिसांनी त्याला ते रिल काढायला लावले.नंतर त्या तरुणाला पोलिसांनी माफी मागायला लावली.माझे नाव बाळेश दुर्गी असून मी अथणी तालुक्यातील शिनाळ गावचा आहे.मी शर्ट काढून रिल तयार केल्याबद्दल क्षमा मागतो.पुन्हा एकदा मी अशी चूक करणार नाही अशा शब्दात माफी मागितली.त्या तरुणाचा रिल आणि माफी मागितलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.