*दंड वसुलीसाठी पोलिसांनी लढवली आगळीवेगळी शक्कल*
जुना दंड नागरिकांकडून कशा प्रकारे वसूल करावा याची आगळी शक्कल पोलिसांनी लढविली आहे. ते शहरात ठीक ठिकाणी उभारून सर्ववाहनधारकांची अडवणूक करत आहेत तसेच त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची विचारणा करत आहेत.
सध्या जुना दंड भरण्याकरिता 50 %सवलत 11 फेब्रुवारी पर्यंत असल्याने रहदारी पोलीस ठिकठिकाणी थांबून वाहनधारकांची अडवणूक करत आहेत आणि त्यांच्याकडून दंड वसूल करत आहेत.
शहरातील सुमारे 26 कोटींचा दंड थकीत आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही वेगळी शक्कल लढविली आहे. जरी वाहनधारकांनी हेल्मेट घातली असेल तरी त्याची अडवणूक करून त्याच्याकडील कागदपत्र तपासले जात आहेत यामध्ये आरसी कार्ड प्रदूषण प्रमाणपत्र ही तपासले जात आहेत.
जर ही कागदपत्रे व्यवस्थित असल्यास त्यांना जुना दंड भरण्याकरिता तगादा लावण्यात येत आहे तसेच काही दुचाकी धारकांच्या चाव्या काढून घेऊन गाडी एका कोपऱ्यात लावण्यात येत आहे आणि दंड भरून या मगच दुचाकी देऊ असे पोलीस सांगत आहेत.
त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर काही व्यक्तींचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन करून दंड भरा असा नाहक त्रास सुद्धा पोलीस देत आहेत. शहरातील कोल्हापूर सर्कल कॉलेज रोड चन्नामा चौक आरटीओ सर्कल अशोक सर्कल या ठिकाणी पोलीस थांबत असून त्यांच्याकडून जुन्या दंड देखील कार्यालयामध्ये भरून घेत आहेत.