बेळगाव: जुन्या मनपा इमारतीचा जणू झाला कायापालटच. कोनवाळ गल्ली येथील ही मनपा कार्यालयाची इमारत ही अतिशय जुनी असल्याकारणाने काही ठिकाणी इमारत मोडकळीस आली होती.इमारत परिसरात अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे कर्मचारी व जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
या इमारतीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध नव्हत्या. इमारतीला कधीच रंगरंगोटी ही करण्यात आली नव्हती.लोक निवडणुकीच्या वेळी मतदान करण्यासाठी येत .त्यावेळी ही इमारतची अवस्था पाहून लोक असमाधान व्यक्त करत होते.
पण आज डॉ गजानन कांबळे यांच्या प्रयत्नातून या जुन्या इमारती दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच वाहन लावण्या करण्याकरिता लोखंडी शेड ही उभारण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यातून व जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.तसेच डॉ गजानन कांबळे यांचे कौतुक होत आहे.