This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रात्र वैऱ्याची आहे ,मराठ्यांनो जागे राहा*

*रात्र वैऱ्याची आहे ,मराठ्यांनो जागे राहा*
D Media 24

रात्र वैऱ्याची आहे ,मराठ्यांनो जागे राहा

रात्र वैऱ्याची आहे ,मराठ्यांनो जागे राहा. विरोधक आपल्यामध्ये फाटा फोडण्याचे काम करतील. मात्र एकजुटीने आपण सध्या ज्या प्रकारे एकत्रित आलो आहोत त्याच प्रकारे आता सुद्धा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला गाठायचे आहे आणि बेळगावात मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे आहे.

 

पाहिलात ना याआधीही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसची सत्ता आली आपणच त्यांना साथ दिली आणि मराठीसाठी झगडणार्‍या मराठी माणसांकडे दुर्लक्ष केले.

 

म्हणूनच आज महानगरपालिकेवर भगव्या ऐवजी लाल पिवळा फडकत आहे तोही आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळे आता डोळे बंद करून चालण्याचे नाही तर डोळे उघडे ठेवून मतदान करण्याची वेळ आली आहे.

 

सर्वजण म्हणतात की मराठ्यांची संख्या ही उ कमी आहे. मात्र सध्या पाहिल्या असता जवळपास 65 हजाराहून अधिक मतदार मराठी आहेत आणि जर यांनी एकत्र येण्याचा निर्धार केला तर मराठ्यांची सत्ता येणार आहे.

मात्र आपलीच लोक मराठी कडे पाठ दाखवून इतर राष्ट्रीय पक्षांना मतदान करत आहेत. जे राष्ट्रीय पक्षांमध्ये गेलेले मराठी भाषिक आहेत मतदान करताना त्यांनी एकदा विचार करून करण्याची गरज आहे.अहो मतदान करताना तुमचा पक्ष बघणार आहे का ?तुम्ही कोणाला मत दिलाय नाही ना मग शहाणे व्हा आणि निर्णय घ्या

आता प्रचारादरम्यान फक्त भगवा झेंडा आपल्याला दिसला लाल पिवळा नाही. तोच जर राष्ट्रीय पक्ष विजयी झाला तर भगव्या ऐवजी आपल्याला लाल आणि पिवळाच सर्वत्र दिसेल आणि ही सत्य परिस्थिती आहे बरं का.

पैशाचे आमिष दाखवून रातोरात सर्वजण आपल्याला गाफील करतील. तेव्हा शांत रहा आणि सकाळी उठून आपल्या मराठीसाठी मराठी भाषेसाठीच मतदान करा.

आता मतदान केले तर काय होईल

 

मराठी मतदारांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मतदान करून काय होईल तर याने आपली एकजूट दिसेल आणि येणाऱ्या खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या वेळेस राष्ट्रीय पक्ष इतर भाषिकांना उमेदवारी देण्याऐवजी ते मराठी भाषिकालाच देतील आणि आपले वर्चस्व बेळगाव मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टिकून आहे ते अखंडितपणे टिकून राहील आणि राष्ट्रीय पक्षांच्या मनात एक वेगळाच प्रकाराची भीती निर्माण होईल

 

मराठी माणसाला आपण बाजूला सारण्याचा जर प्रयत्न केला तर आपण पूर्णपणे नेस्तानुभूत होईन ही भीती राष्ट्रीय पक्षाच्या मनात राहील .अहो येतात का हे राष्ट्रीय पक्ष आपल्या मराठी साठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आठवा एकदा एका का हो दोन दा आठवा नाही ना .

मराठी माणसेच मराठी साठी येतात पोलीस पकडले कन्नड मध्ये बोला स्टेशन मध्ये हि कन्नड ,सर्वत्र फलक कन्नड ,निवेदन देणार ते हि कन्नड मध्येच द्यावे लागले कारण अधिकाऱ्यांना मराठी येत कुठे ,मुळात तर कानडीच आहेत .आणि आपली माणसं मग गेली कुठे ??पडतो ना प्रश्न मग विचार करा

बेळगाव उत्तर दक्षिण किंवा ग्रामीण कोणताही भाग असो या ठिकाणी फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच वर्चस्व प्रस्थापित होण्याची गरज आहे .त्यासाठी एकत्रित यायला हवे

 

यंदाची उमेदवारी जर आमदार अनिल बेनके यांना दिली असती तर सर्व मराठा पुन्हा एकदा एकत्र आले असते.आणि भाजप पक्ष डोळे बंद ठेवून विजयी झाला असता .मात्र आता या राष्ट्रीय पक्षाला देखील धडकी भरली आहे त्यामुळे ते केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमदार कन्नड अभिनेते अनेक भाजपचे पदाधिकारी बेळगाव मध्ये आणून त्यांचा प्रचार करत आहे.

 

राष्ट्रीय पक्ष हा आपल्यासाठी लढणार नाही तसेच आपल्याला मराठीतून कागदपत्रे देणार नाही मराठी माणसाला आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्याऐवजी कन्नड शाळेमध्ये घालावे लागेल

 

नाईलाजास्व आपल्याला कन्नड ही आई म्हणावी लागेल आणि मराठी ही मावशी म्हणावी लागेल. त्यामुळे आपल्या सर्वांना मावशी जवळची आहे का आई हेच ठरवायचे आहे.

 

मावशी पेक्षा आई ही श्रेष्ठ असते त्यामुळे मराठी भाषेला मराठी अस्मितेला मतदान करून मराठ्यांचे वर्चस्व बेळगावात प्रस्थापित करण्याची हीच ती वेळ आहे जर ही आपण संधी सोडली तर येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला पहिले पाढे 55 मोजावे लागतील.

 

त्यामुळे विचार करा इतकंच सांगेन धन्यवाद

एक मराठी माणूस

मराठी माणसाची कळकळीची विनंती काही असो काहीही होवो
मराठी माणसालाच मत द्या

 

कानडी लोक एकत्रित होत आहेत मुस्लिम एकत्रित होत आहेत मग मराठी का नाही?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले मोगलांना देऊ केले. मात्र त्याच्या अनेक कित्येक पटीने आपल्या स्वतःच्या हिमतीवर मावळ्यांच्या मदतीने ते काबीज केले
त्याचप्रकारे आपण सर्वजण एकेक मतदान करून मराठ्यांना एकत्रित आणू शकतो आणि आपले वर्चस्व कायम ठेवू शकतो

 

 

बघा पटतंय का


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply