शुभम शेळकें यांच्या हद्दपारिवर पुढील सुनावणी 21 एप्रिलला
माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम.कालिमिर्ची यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग चे अध्यक्ष यांना बेळगाव जिल्हा बंदी व हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे 22 मार्च रोजी ठेवला होता, तशी नोटीस शुभम शेळके यांना 28 मार्च रोजी देण्यात आली होती, आज 7 एप्रिल रोजी न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर झाली, शुभम शेळके यांच्या वतीने ऍड.महेश बिर्जे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदविला, आक्षेप नोंदवताना ऍड.महेश बिर्जे यांनी शुभम शेळके यांच्यावर सात गुन्ह्यापैकी दोन गुन्ह्यात माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून उर्वरित गुन्हे माननीय न्यायालयासमोर न्यायासाठी प्रलंबित आहेत, असे असतांना जर कारवाई झाली तर हे घटनेने दिलेल्या अधिकाराचे व कायध्याने घालून दिलेल्या संविधानाचे उल्लंघन असून माळमारुती पोलीस स्थानकाने केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर आहे, असा आक्षेप नोंदविण्यात आला.https://dmedia24.com/organizing-guidance-camp-on-behalf-of-navhind-sports-center/
या सुनावणी वेळ ऍड.बाळासाहेब कागणकर,ऍड.रिचमॅन रिकी, ऍड.वैभव कुट्रे,ऍड.अश्वजित चौधरी, धनंजय पाटील,मनोहर हुंदरे,नगरसेवक शिवाजी मंडोळकर,प्रविण रेडेकर,विजय जाधव,अशोक घगवे,चंद्रकांत पाटील,सुरज जाधव,मोतेश बार्देशकर,अभिषेक कारेकर, आदी उपस्थित होते.