बेळगाव, दि. २७ – संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पाटील मळ्यात बुधवारी रात्री घडली.
अनिल शरद धामणेकर (४६) रा. पाटील मळा बेळगाव असे या चाकू हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान आदित्य दीपक धामणेकर आणि अनिल धामणेकर (काका) यांच्यात वादावाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन आदित्यने अनिल यांच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अनिल यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने रात्री साडेबाराच्या दरम्यान अनिल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पुतण्या आदित्य दीपक धामणेकर आणि काका अनिल शरद धामणेकर यांच्यात संपत्तीवरून काही वर्षांपासून वाद सुरू होता बुधवारी रात्री हा वाद उफाळला आदित्य यांने आपळे काका अनिलवर चाकूने वार करून खून केला.