इतिहास समजून घेण्यासाठी चित्रपटांचे माध्यम प्रभावी ठरते आहे _अभिनेता संतोष जुवेकर
बेळगाव प्रतिनिधी
मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून लोकप्रिय बनलेले अभिनेते संतोष जुवेकर यांनी शनिवारी सायंकाळी येथील स्वरूप नर्तकी चित्रपटगृहाला भेट दिली. स्वरूप नर्तकी चित्रपटगृह आणि गोगटे फाउंडेशन यांच्यावतीने त्यांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी मध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच आपला अभिनयाचा प्रवास उलगडला. अलीकडच्या दिवसांमध्ये टेलिव्हिजन आणि चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडत आहेत ही स्वागतार्ह
बाब आहे.
नव्या पिढीच्या हातामधील नव्या माध्यमातून इतिहास जाणून घेण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल असे विचार अभिनेते संतोष जुवेकर यांनी व्यक्त केले.
छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र रायाजी मालगे यांची भूमिका साकारल्यानंतर आपल्याला छावा चित्रपटाने बरेच काही दिले आहे.हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी एक मंदिर आहे अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सिने प्रदर्शक अविनाश पोतदार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. संतोष जुवेकर यांच्यासाठी प्रा.संध्या देशपांडे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन आनंद गाडगीळ यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून खासदार जगदीश शेट्टर , मराठा मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्ष राजश्री हलगेकर,माजी आ. संजय पाटील यांच्यासह उद्योजक शिरीष गोगटे,अजित गरगट्टी, संजय बिच्चू, अशोक नाईक, मीडिया वन कंपनीचे संचालक गणेश गारगोटे आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. मैसूर पगडी छत्रपती,शिवरायांची प्रतिमा आणि शाल अर्पण करून संतोष जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
*येळ्ळूर विभाग म.ए. समितीची सोमवारी बैठक*