हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन डेपो येथे प्रती महामेळावा मराठी भाषिकांचा आयोजित करण्यात येतो मात्र या महामेळाव्याला पोलिसांनी 144 कलम लागू करून हा महामेळावा करण्यास मज्जाव केला.
याबरोबरच पोलिसांनी समितीच्या काही नेत्यांना धरपकड केली. आणि काही कार्यकर्त्यांना वाहनामध्ये डांबले.
दरवर्षी या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा प्रथमच खंडित झाल्याने मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
समितीने त्यांनी याआधी पोलिसाना अर्ज देऊन रीतसर परवानगी मागितली होती मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून वॅक्सिंग डेपो मैदानापासून 500 मीटर अंतरापर्यंत 144 कलम लागू केले. आणि कार्यकर्त्यांना अटक केली.