क्रांतिवीर संगोळी रायण्णा २०२५ उत्सवाला संगोळी येथे थाटात प्रारंभ झाला.शोभायात्रेत सहभागी झालेल्या कला पथकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
इंग्रजांना सलो कळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा उत्सवाच्या निमित्ताने
संगोळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सिध्दलिंगेश्वर संस्थान हिरेमठचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संगोळी रायण्णा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विविध ठिकाणी फिरून आलेल्या विर ज्योतीचे स्वागत आमदार महांतेश कौजलगी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर कित्तूर संस्थानचा ध्वज फडकावला.डोक्यावर मंगल कलश घेऊन सुहासिनी शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.मुलींचे झांज पथक,धनगरी ढोल पथक,केरळचे वाद्य पथक ,वेगवेगळे मुखवटे धारण केलेले कलाकार हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले.