*निरोगी शरीराचं मुलमंत्र म्हणजे योग प. पू प्राणलिंग महास्वामिजी*
21जून रोजी जागतीक योग दिनानिमित्त श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे विश्व हिंदू परिषद आणि पतंजली योग निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योग करण्यात आला यावेळी प.पू. प्राणलिंग महास्वामीजी प. पू. प्रभुलिंग महास्वामीजी शिक्षण अधिकारी रेवती हिरेमठ मॅडम डी एस कुंभार सर यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प. पू. प्राणलिंग महास्वामीजी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की
21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. योग हा भारतातल्याच नव्हे तर जगातील सर्व नागरिकांना आरोग्य चे महत्त्व पटावं दिलेले आहे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी 21 जून हा जागतिक योगा दिन साजरा करण्याचे निश्चित केलं आणि तो जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला. आपल्या देशातील सर्व भारतीय साठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
योगा का करावा ? योगाचे महत्व काय ? योगा केल्याने खरोखर शरीराला फायदा होतो का ? योगाने आपले आरोग्य खरोखर निरोगी राहते का ? योगा सर्वांना करता येऊ शकतो का ? असे अनेक प्रश्न ज्यांनी आज पर्यंत योगा केलाच नाही त्यांना पडत असतो. काहींना योगा करण्याची खरोखर इच्छा असते परंतु आपल्याला जमेल की नाही या भावनेतून ते कधी प्रयत्नच करत नाहीत. काहींना आपल्या वजनाची लाज वाटते तर काहींना आजारपण किंवा मानसिक ताण यामुळे योगा किंवा व्यायाम करावासा वाटत नाही. या सर्वांच्या प्रश्नांचे किंवा योगा बाबतीतील समस्यांचे समाधान आपल्याला योग करूनच मिळणार आहे. योगा हा अनेक शतकांपासून चालत आलेला पारंपारिक व्यायाम प्रकार आहे. योगा मधील काही सहज प्रकार जे आपण अत्यंत सहजपणे करू शकता असे प्रकार आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे मोठया प्रमाणात आहेत
जीवनात आनंद आहे, असलाच पाहिजे ज्या योगामुळे आरोग्य सुधारते, जसे ऋषी मुनी यांनी बीजमंत्र स्वीकारल्यानंतर पापाचा आजार काळजाला शिवत नाही तसेच योग आणि व्यायाम स्वीकाराल्यानंतर शारीरिक व्याधींना शरीरात प्रवेश शून्य होतो..
आपल्या देशाची संस्कृती पाहता भारतीय संस्कृती ने जगाला खूप मोठी देणगी दिलेली जग त्याच्या अनुसरून करत आहे आहे पण आपल्याच देशातील लोकांना याचे महत्त्व समजले नाही हे दुर्दैव आहे.
जगने आपली संस्कृती स्वीकारत आहे हे पाहून फार फार आनंद होतो, अर्थातच हे फार पूर्वी व्हायला हवे होते पण उशिरा का होईना जगाने भारतीय संस्कृती आचरणात आणत आहेत तसेच आपली भारतीय जनतेला याचे भांन आले, आणि सर्व शाळांमध्ये सुद्धा योग सूर्यनमस्कार गोष्टी शिकवल्या जातात हे स्वागतार्हच ..
कारण आपल्याला अंतर राष्ट्रीय योग गुरू प. पू संगमदेव स्वामीजी यांनी आम्हाला फार वर्षापासूनच या योगाचे महत्व स्वतःच्या कृतीतून आम्हाला स्वीकारायला लावून दिले आहे..
नित्य जीवनात स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फक्त एक तास योग करायचा, आणि,निरोगी आयुष्याचा मंत्र जपायचा.देशाला आज ज्या पिढीची गरज आहे ती पिढी या योग,सूर्यनमस्कार, व्यायाम करण्याने आणि या बीज मंत्रानेच मिळू शकते…
म्हणुन सर्वांनी नियमित योग ध्यानधारणा सूर्यनमस्कार हे करावे व याचा लाभ करून घ्यावा असे आव्हान परमपूज्य स्वामीजी यांनी या कार्यक्रमानिमित्त केले. यावेळी लहान मुले तरुण वयस्कर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी शिक्षणाधिकारी रेवती हिरेमठ मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच योगाचार्य डी एस कुंभार सर यांनी सर्वांकडून योगा करून घेतला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते