भारतीय फलंदाज ढेपाळले
दुसरी कसोटी , दिवस पहिला
अडलेड:
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ऍडलेड येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील दुसरी कसोटी खेळली जात आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली. ही कसोटी गुलाबी चेंडूवर दिवस रात्र खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव सर्वबाद 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एक बाद 86 अशी भक्कम सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे अजून नऊ विकेट बाकी असून अजून 86 धावांनी ते मागे आहेत. ऑस्ट्रेलियाचा मिचल स्टार्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 48 धावा देत सहा विकेट घेतल्या.
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर के एल राहुल आणि शुभमन गिल यांनी भारतीय डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या गाड्यांसाठी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर के एल राहुल 37 आणि शुभमन गिल 31 धावांवर बाद झाले.
तसेच विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा ही स्वस्तात बाद झाले. अशावेळी ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पुन्हा एकदा भारतीय डाव सावरला.
भारताकडून नितीश कुमार रेड्डी ने सर्वाधिक 42 धावा केल्या. मोहम्मद सिराज चार धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला 1 एक बाद 86 धावा केल्या होत्या.