छत्रपती संभाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा 28 जानेवारीला
बेळगांव:शहरातील केंद्रबिंदू स्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा येत्या 28 रोजी पार पडणार आहे. या ठिकाणी छत्रपती श्री संभाजी महाराजांची मूर्ती चौथरा आणि आजूबाजूला सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे 28 जानेवारी रोजी या ठिकाणी थाटामाटात लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती उत्तरचे आमदार आणि बेनके यांनी डी मीडियाशी बोलताना दिली.
https://fb.watch/ifE9ltlOWT/
यावेळी ते म्हणाले की गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी या ठिकाणी होम करून महापूजा करण्यात येणार आहे. तर 28 तारखेला सकाळी पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत महाराजांना राज्याभिषेक हा कार्यक्रम करणार आहे.
https://fb.watch/ifEaF3GBSK/
तर संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत येथील कामाचे सुशोभीकरण आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली.
तसेच त्यांनी येथील काम हे कोणत्याही लोकवर्गणीतून झाले नसून या कामाकरिता सरकारी निधी वापरल्या असल्याचे देखील स्पष्ट केले. तसेच या कार्यक्रमाला दिग्गज अतिथी उपस्थित राहणार असून बेळगावकरांनी या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी डी मीडियाच्या माध्यमातून केले आहे.