बेळगांव:काल बेळगाव मध्ये काँग्रेसच्या १०० गांधी जय बापू ,जय संविधान, जय भीम या कार्यक्रमाची आयोजन बेळगाव शहरांमध्ये करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसना १ दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. त्यासाठी निमित्त मुले खेळण्यासाठी पोहण्यासाठी व इतर खेळांसाठी मैदानात गेली होती. तर वाघवडे येथील शालेय विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तलावाकडे गेला होता. दुर्दैवाने या तलावामध्ये त्या शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मंगळवारी मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे.
गणेश हिरामणी सुतार वय वर्ष (१५) राहणार वाघवडे असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश सुतार हा मंगळवारी रात्री घरी न आल्याने. त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. शोधाशोध करत असताना तलावाशेजारी गणेश सुतार यांचे कपडे आढळून आले. त्यावरून त्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पथकाने धाव घेऊन त्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याविषयी अधिक तपास सुरू आहे.यामुळे संपूर्ण वाघवडे गावावर शोककाळा पसरली आहे. गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.