बेळगाव :
मराठा समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या आंदोलनाला आता मोठा न्याय मिळाला आहे. राज्यभर गाजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अभूतपूर्व यश लाभले असून यामुळे मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची दारे उघडली जाणार आहेत.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठा बांधवांनी आनंद व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले आहे. बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. धर्मवीर संभाजी चौक येथे मराठा समाजाचा “विजय उत्सव” साजरा केला जाणार आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच बेळगावातील मराठा समाजाने ठाम पाठींबा दिला होता. समाजातील सर्व घटक या यशाबद्दल आनंदित असून एकीचा आणि ताकदीचा संदेश यानिमित्ताने पुन्हा एकदा देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मराठा समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.